चंदगड येथे दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना महादेव शिवणगेकर, व्यासपीठावर इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
"आपलं जीवन ही एक स्पर्धा आहे. अशा अनेक स्पर्धांना आपल्याला तोंड द्यावे लागते. स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा. तणावमुक्त वातावरणात स्पर्धाना सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी गती आणि मती शाबूत ठेवल्यास यश हमखास मिळते. " असे प्रतिपादन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर यांनी केले.
दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे इ. दहावी सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. व्ही.आर. बांदिवडेकर होत्या. प्रास्ताविक प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे चंदगड पंचायत समितीचे सभापती अॅड. अनंत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 'विद्यार्थी जीवनात जे संस्कार होतात तीच आपली आयुष्यभराची शिदोरी असते. ' असे प्रतिपादन सौ. बांदिवडेकर यांनी केले. कु. सानिका जांभळे, अनुजा खंदाळे, कौस्तुभ गुरव या विधार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.एम.व्ही.कानूरकर, टी. टी. बेरडे , एस.जी .साबळे याची भाषणे झाली.
कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य, एल.डी. कांबळे, पर्यवेक्षक एस.आर. देवण , एस.जी. सातवणेकर, एम.एल. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर.चिगरे यांनी तर आभार टीएस. चांदेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment