चंदगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारापदी अभिजित जगताप रुजु - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2020

चंदगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारापदी अभिजित जगताप रुजु

अभिजित जगताप
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या मुख्याधिकारीपदी अभिजित लक्ष्मण जगताप हे आज चंदगड नगरपंचायतीमध्ये रुजु झाले. प्रशासक तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडून आज त्यांनी पदभार स्विकराला. 
अभिजित जगताप यांचे मुळ गाव सोलापूर असून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून (एमपीएससी) 2017 साली दिलेल्या परिक्षेमधून त्यांची मुख्याधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांचे बी-टेक कॉम्प्युटर्स इंजिनिअर असे शिक्षण झाले आहे. चंदगड नगरपंचायतीच्या लोकनियुक्त पहिल्याच सभागृहाचे पहिलेच मुख्याधिकारी म्हणून श्री. जगताप हे नोकरीची सुरुवात चंदगडमधून करत आहेत. हा एक योगायोग आहे. 
नगरपंचायत कार्यालयामध्ये आज नूतन मुख्याधिकारी श्री. जगताप व प्रशासक विनोद रणवरे यांचा सत्कार नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सचिन नेसरीकर, बाळा हळदणकर, दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

1 comment:

Abhijeet said...

Congratulations on your achievement.

Post a Comment