कुदनुर ग्रामपंचायतीमार्फत 4 एप्रिलपर्यत शंभर टक्के गाव बंद, गावात औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2020

कुदनुर ग्रामपंचायतीमार्फत 4 एप्रिलपर्यत शंभर टक्के गाव बंद, गावात औषध फवारणी

कुदनूर : येथे ग्रामपंचायतीमार्फत टँकरमधून गावात औषधाची फवारणी केली जात आहे.
कोवाड / प्रतिनिधी
कुदनूर (ता. चंदगड) ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गाव बंदवर जोर दिला आहे. दक्षता समितीच्या माध्यमातून बाहेर फिरणाऱ्यांना स्थानिक पातळीवर लगाम घातला जात आहे. गावात औषधाची फवारणी सरु केली आहे. बाजारपेठेसह गल्ल्यांतून औषधांची फवारणी करुन निर्जतुकीकरण केले जात आहे. ३० मार्च ते ४ एप्रिल पर्यंत गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने आज पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून गावात सन्नाटा होता.
गावची लोकसंख्या मोठी असल्याने ग्रामपंचायतीने लॉकडाउन शंभर टक्के यशस्वी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी दक्षता समितीची नियुक्ती केली आहे. घरातून बाहेर पडणाऱ्याना दक्षता समितीकडून लक्ष केले जात आहे. बाजारपेठेत फिरणाऱ्याना चोप दिला जात आहे. गेल्या चार दिवसापासून गावात बाहेरून आलेल्याना स्वतंत्र क्रारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत. शाळेच्या इमारतीमधून विलगीकरणाची सोय केली आहे. पण काॅरंटाईनसाठी लोक प्रतिसाद देत नसल्याने ग्रामपंचायतीने पोलिसांची मदत मागविली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ४ एप्रिल पर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजीपाला, किराणा यासह दुध संस्थाही बंद ठेवल्या आहेत. गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. ट्रॅक्टर टँकरमधून औषधांची फवारणी केली जात आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर ,तहसिलदार विजय रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच शालन कांबळे उपसरपंच नामदेव कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य व दक्षता समितीचे सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment