कागणीतील धनाजी जांभळेकडून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना हॅडवॉश, हॅन्डग्लोजचे मोफत वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2020

कागणीतील धनाजी जांभळेकडून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना हॅडवॉश, हॅन्डग्लोजचे मोफत वाटप


कोवाड / प्रतिनिधी      
कोरोणा रोगाचा कहर हा जगभर सुरू असतानाच देशासहित राज्यात सगळीकडे वाढत्या रुग्णाच्या संख्येने सगळीकडे विदारक स्थिती बघयला मिळत आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी हे जीव मुठीत घेवून काम करताना दिसत आहे. परंतु त्यांच्याकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह एक्विंपमेंटची पुरेशी व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. औषध दुकानातून मास्क सॅनिटायझरचा साठा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत कागणी येथील युवक धनाजी नरसु जांभळे यांनी कोवाड मध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचारी यांना आपल्याकडील 50 हॅन्डग्लोवज आणि प्रत्येकी एक  हॅडवॉश देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ही अशा प्रकारच्या वस्तू  ज्या प्रमाणे उपलब्ध होतील. त्याप्रमाणे त्यांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. सध्यस्थितीत ग्रामपातळीवर या सर्वाना घरो घरी जाऊन माहिती संकलित करावी लागत असल्यामुळे  या सर्व वस्तू त्यांच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यावेळी  उपसरपंच विष्णु आडाव, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शंकर पाटील, रणजित भातकांडे, श्रीकांत पाटील, रामा वांद्रे, जोतिबा वांद्रे, विनायक राजगोळकर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment