चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या धास्तीने चंदगड तालूक्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सूरू होते,या खासगी डॉक्टरांच्या या शक्तीवर समाजातील सर्वच स्तरातून मोठ्या टिका झाली,अखेर शासनाने दवाखाने बंद ठेवून नागरिकांची गैरसोय करणार्या या खासगी डाॅक्टर कारवाईचा बडगा उगारल्याने तालूक्यातील काही डाॅक्टरानी आज आपले दवाखाने सूरू करून नागरिकांनी सेवा देण्यास सुरवात केली.
कोरोनाच्या धास्तीने सर्वांनीच खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.मात्र खेड्यातील नागरिकांचे देवदूत बनलेल्या खासगी डाॅक्टरनी आपले दवाखाने बंद केल्याने नागरिकांचे हाल सूरू होते.दवाखाने बंद मात्र मेडिकल सूरू अशी स्थिती चंदगड तालूक्यात होती याबाबत तहसिलदार विनोद रणवरे यांच्या कडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या .खासगी दवाखाने बंद ठेऊ नये असा जिल्हाधिकारी यानी आदेश दिला असतानाही असतानाही चंदगड तालूक्यातील खासगी डाॅक्टरानी दवाखाने बंद ठेवले होते. काही डाॅक्टरयानी तर दवाखान्यासमोर दवाखाने 31मार्च पर्यंत बंद असल्याच्या पाट्या लावल्या आहेत.अखेर प्रशासनाने ग्रामीण भागातील बंद असलेल्या खासगी डाॅक्टरांवर कडक कारवाई चे पाऊल उचल्याने कारवाईच्या धास्तीने दवाखाने सूरू केले .तालूक्यातील कोवाड , डूक्करवाडी, माणगाव, पाटणेफाटा, कलिवडे, कारवे,तूडये,कोवाड, हलकर्णी फाटा,नागनवाडी, दाटे येथील खासगी डाॅक्टरानी आपले दवाखाने सूरू करून नागरिकांनी सेवा देण्यास सुरवात केल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डाॅ.आर के खोत यानी दिली.
No comments:
Post a Comment