कोरोणामुळे सोमवार पासून कोवाड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा ग्रामस्तरीय कमिटीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2020

कोरोणामुळे सोमवार पासून कोवाड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा ग्रामस्तरीय कमिटीचा निर्णय


कोवाड  ग्रामपंचायतीमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित जि प. सदस्य कल्लाप्पा भोगण, उपसरपंच विष्णू आढाव, शंकर पाटील.
कोवाड / प्रतिनिधी   
जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातला असून भारतासहित राज्यात देखील कोरोणा बाधित रुग्णाचा आकडा वाढत चालला आहे.कर्यात भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोवाड  (ता. चंदगड)  येथे संचार बंदी असून देखील आजूबाजूच्या गावातील काही नागरिक हे वेगवेगळी कारणे दाखवून रस्त्यावर फिरताना दिसत असल्याकारणाने आणि गावातील नागरिकांची सुद्धा सायंकाळच्या दरम्यान साहित्य खरेदीच्या कारणाने गर्दी होत असल्यामूळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून कोवाड मधील सर्व दुकाने, दूध डेअरी ही बंद करण्याचा निर्णय ग्रामस्तरीय कमिटीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
विविध शहरातून आलेल्या आणि होम कॉरंटाईन असलेल्या व्यक्ती ना देखील पुढील 14 दिवस घराबाहेर पडू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.विनाकारण बाहेर गावातून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश बंदी घालण्याचे ठरविण्यात आले असून संचार बंदीतील पुढील काही दिवस संभाव्य धोका ओळखून सगळे व्यवहार  म्हणजे दूध डेअरी सहित किराणा दुकान,भाजीपाला विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार असून दोन पेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या निवेदनाच्या प्रती ह्या पोलीस उपनिरीक्षक कोवाड,सर्व डेअरी आणि कोवाड व्यापारी संघटनेला देण्यात येणार असल्याचे सरपंच सौ. अनिता भोगण यांनी सांगितले.यावेळी जि.प. सदस्यकल्लाप्पा भोगण,उपसरपंच विष्णू आडाव, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शंकर पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील,आदम मुल्ला,विनायक राजगोळकर,ग्रामसेवक जी. एल. पाटील, वसंत व्हन्याळकर, मारुती वांद्रे, मारुती भोगण, रणजित भातकांडे, रामा वांद्रे, जोतिबा आडाव, विष्णू बुरुड, परशराम भोगण, जोतिबा वांद्रे यांच्या सहित नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामपातळीवर काम करण्याऱ्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना सर्व नागरिकांनी खरी माहिती देऊन सर्व्हेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment