कोवाड : ढोलगरवाडी ग्रामस्थानी रस्त्यावर लोखंडी पोल व दगड टाकून रस्ता बंद केला आहे |
अशोक पाटील / कोवाड
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, घराबाहेर पडू नका. असे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. संचारबंदीचा आदेश गावकरी पाळत आहेत. मात्र मोठ्या शहरांतून आलेले युवक क्वारंटाईन असतानाही गावातून उघडपणे फिरत असल्याने गावकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तालुक्यातील बहुतांशी गावातून ही परिस्थिती असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन आहे . कुणीही घराबाहेर पडू नये , अशा सक्त सुचना शासनाकडून दिल्या जात आहेत . त्यामुळे ग्रामीण भागातील लोकानी या आदेशाचा पालन करताना काळजी व खबरदारीही घेतली आहे . आपापल्या गावच्या मुख्य रस्त्यावरुन दगड , माती व झाडे आडवी टाकून रस्ते बंद केले आहेत . गावातून कुणालाही गरज नसताना बाहेर सोडायचे नाही आणि अनोळखी व्यक्तिला गावात घ्यायचे नाही , असे धोरण ठेवले आहे . यामुळे गावातील ऐरवी गजबजलेल्या गल्ल्याही शांत झाल्या आहेत . पण लॉकडाउन २१ दिवसांचा असल्याने मोठ्या शहरातून अनेक लोक गावाकडे परतू लागले आहेत . बहसंख्य लोकानी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणीच्या आधारावर गावांतून एंट्री केली आहे . नवीन आलेल्या लोकांच्या गावस्तरावर नोंदी ठेवल्या आहेत . त्याना १४ दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत , पण त्यांच्यावर शासकीय वचक कमी झाल्याने वारंटाईनचे शिक्के मारलेले असतानाही हे लोक गावातून आता उघड फिरु लागले आहेत . काही युवक तर पाटर्या आणि खेळातून दंग होत आहेत . शासनाने तात्काळ बाहेर फिरणाऱ्या होम कारंटाईन यांच्यावर कारवाई करावी , अशी मागणी होत आहे .
शिवनगे ग्रामस्थांनी शनिवारी रात्री पासून गावातून नागरीकाना बाहेर न सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला . कुणीही घराबाहेर पडायचे नाही . शेताकडे जाणाऱ्यानाही पुढील तीन दिवस बंद केले आहे .
No comments:
Post a Comment