शेती पंपासाठी दिवसा विजपूरवठा व्हावा,शेतकरी वर्गातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2020

शेती पंपासाठी दिवसा विजपूरवठा व्हावा,शेतकरी वर्गातून मागणी


कोवाड / प्रतिनिधी 
कोरोणा विषाणूमुळे संपूर्ण जगासहित देशासमोर संकट उभे राहिले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्रसरकार व राज्यसरकार कडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.खबरदारी म्हणून संपूर्ण देशभर 21 दिवस लॉकडाऊन ची घोषणा ही करण्यात आली आहे.देशासहित संपूर्ण राज्य बंद असून राज्यातील औधोगिक  कारखाने सध्य स्थितीत बंद अवस्थेत असून त्यासाठी पुरवठा होत असलेल्या विजेची मागणी कमी झाली आहे.     या लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा मधून कृषी विषयक काही गोष्टी ह्या वगळण्यात आल्या असून शेतकऱयांना खते बी बियाने उपलब्ध होतील अश्या प्रकारचे आदेश दिले आहेत.परंतु सध्य स्थितीचा विचार करता शेती साठी जो वीजपुरवठा करण्यात येतो त्याच्या वेळा ह्या रात्रीच्या असून अश्या रात्रीच्या वेळी संबधीत शेतकरी हे शेतामध्ये पाणी देण्यासाठी एकटे जायला धजावत नसल्याचे चित्र बघायला मिळते,त्यासाठी कोणाची सोबत त्यांना घ्यावी लागत आहे .कोरोणा पासून बचावासाठी एकीकडे सोशल डिस्टनसिंग हा चांगला पर्याय असल्याचे सरकार कडून सांगितले जात असून जर शेतकऱ्याना दिवसा वीजपुरवठा केला गेल्यास तो एकटा काम करू शकतो आणि साहजिकच एकटा दिवसभर शेतामध्ये काम करु शकतो. त्यामुळे दिवस वीजपुरवठा करण्यात यावा ही मागणी सर्व शेतकर्यातून जोर धरत आहे.


No comments:

Post a Comment