माणगाव येथे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2020

माणगाव येथे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी

माणगाव येथे औषध फवारणी करताना माजी प. स  सदस्य अनिल सुरूतकर, जयवंत कांबळे, शिवाजी फडके, बाळू नाईक, सुशांत नौकूडकर, सलिम मुल्ला.
अडकूर/ प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धास्तीने माणगाव (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात औषध फवारणी केली. माणगाव तालूक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे . या ठिकाणी बाजारपेठ , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा , विविध बँका असल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याबरोबरच परिसरातील ३९ खेडयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहे. अर्थातच या सर्व गावातीत रुग्ण येथील आरोग्य केंद्राकडे येत आहेत. यामूळे माणगाव ग्रामपंचायतीने संपूर्ण गावातील गल्यामध्ये फॉग मशीन व पंपाच्या साह्याने औषध फवारणी केली. तसेच गावामध्ये बाहेरून येणाऱ्या सर्वांची नोंद ठेवण्यात आली असून अशा व्यक्तींची वैद्यकिय तपासणी करून त्याना होम कोरोंन्टाइन केले आहे. माणगाव परिसरातील गावातील लोकांना अनावश्यक फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे . यासाठी माणगावचे सरपंच सौ अश्वीनी कांबळे यांच्यासह उपसरपंच, सर्व सदस्य प्रयत्नशिल आहेत. पण वाढती गर्दी रोखण्यासाठी एका पोलिसाची  गरज या ठिकाणी आहे.

No comments:

Post a Comment