न्हावेली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2020

न्हावेली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी

न्हावेली (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी म्हणून औषध फवारणी करण्यात आली. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील न्हावेली येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावात सर्वत्र औषध फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, आपल्या घरातच थांबावे, रस्त्यावर फीरू नका, गर्दी करू नका,कोरोनाचा धोका संपेपर्यंत घराबाहेर पडू नका अंत्यंत महत्वाचेच काम असेल तर बाहेर पडा असे अवाहन करण्यात आले यावेळी सरपंच गणपत सुतार, उपसरपंच रुक्माणा गावडे, पो.पाटील मनोज गावडे, पत्रकार ज्ञानेश्वर पाटील, जयशिंग हाजगुळकर,अशोक पेडणेकर, चारुदत्त फडणीस, उमाजी देवळी, औदुंबर देवणे ईत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment