संजय पाटील / कोवाड - प्रतिनिधी
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु असतानाच राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाकडून योग्य प्रकारची खबरदारी घेण्यात येत असून आतापर्यंत 7668 जणांची खबरदारीचा उपाय म्हणून चंदगड तालूक्यातील ग्रामीण रुग्णंलय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
चंदगड तालूक्यातील संपूर्ण आरोग्य विभागाची यंत्रणा रात्रं दिवस काम करत आहे.अशातच कोरोनाची धास्ती घेऊन विविध शहरात नोकरीनिमित्त असणारे चाकरमानी हजारोंच्या संख्येने तालुक्यातील विविध गावामध्ये परतत आहेत . कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन गावात प्रवेश दिला जात आहे. त्यातच रोगाच्या धास्तीने संपूर्ण तालुक्यातील विविध ठिकाणी असलेले खासगी दवाखाने हे बंद असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.सध्य स्थितीत तालुक्यात चंदगड,हेरे,कानूर खुर्द,अडकुर,तुडये,माणगाव आणि कोवाड या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व ठिकानामधून गेल्या चार ते पाच दिवसात एकूण 7,668 लोकांची तपासणी करण्यात आली असून एकही संशयित कोरोणा बाधित रुग्ण नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी आर.के.खोत यांनी दिली.
आजअखेर 29 लोक हे परदेशातून तालुक्याच्या विविध गावात आले असून त्यातील 11 जणांचा 14 दिवसांचा होम कॉरंटाईन चा कालावधी पूर्ण झाला असून एकूण 425 लोकांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविले आहे.एवढ्या मोठ्या संख्येने लोक हे येत असून त्यातच सर्वच गावातील खासगी दवाखाने बंद असल्यामुळे मधुमेह ,रक्तदाब, किरकोळ सर्दी खोकल्याचे रुग्ण यांचा भार हा सरकारी दवाखाण्यावर पडत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश पारित करूनही तालुक्यातील अनेक ठिकाणच्या डॉक्टरानी आपापले दवाखाने हे बंद ठेवले आहेत,ते चालू करावेत अश्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर यावर नागरिकांनी काल तहसीलदार यांना दवाखाने चालू ठेवण्याबाबत सूचना करण्यासाठी चे निवेदन सादर केले .सद्य परिस्थितीत तहसीलदार विनोद रणवरे यांनी तालुक्यातील सर्व मेडिकल व्यावसायिक डॉक्टर्स, मेडिकल शॉप,लबोरेटरीज, अंबुलन्स सेवा तसेच अन्य अनुषंगिक सेवा ह्या तात्काळ चालू ठेवण्याबाबत आदेश दिले असून आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करनेबाबतचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मार्फत सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत काही ठिकाणी खासगी दवाखाने सुरु करण्यात आले आहे. मात्र तालुक्यातील संपुर्ण खासगी दवाखाने सुरु झाल्यास सरकारी दवाखान्यावरील ताण कमी होणार आहे. याबरोबरच गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी जिल्ह्यात कोरोणा पॉजिटीव्हचे दोन रुग्ण आढळले असल्यामुळे आपापल्या परीने खबरदारी घ्यावी होम कॉरंटाईन केलेल्या गावातील रुग्णांवर ग्रामस्तरावर केलेल्या कमिटीने लक्ष द्यावे आणि नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याचेही स्पष्ट केले आहेत.
No comments:
Post a Comment