कोवाड ग्रामपंचायतीच्या वतीने शासन निर्णयापर्यंत गाव बंदचा निर्णय, दोन तास अत्यावश्यक सेवा मिळणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2020

कोवाड ग्रामपंचायतीच्या वतीने शासन निर्णयापर्यंत गाव बंदचा निर्णय, दोन तास अत्यावश्यक सेवा मिळणार

कोवाड : येथील बाजारपेठेत आज असा शुकशुकाट होता.
कोवाड / प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीने शासन निर्णय होईपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन काळात दररोज दोन तास भाजीपाला व किराणा दुकाने व दुध संकलन सुरु होते. पण ३० मार्च पासून गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व बाजारपेठेत फेरफटका मारणाऱ्या वाहनांच्यावर कारवाईची मागणी केल्याने आज पहिल्या दिवशी बाजारपेठेत शांतता पसरली. मात्र बाजारासाठी बाहेरुन आलेल्यांची आज सकाळी धावपळ आली.
कोवाड हे परिसरातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने लॉकडाउन काळात सकाळी व संध्याकाळी दोन तास बाजारपेठेतील भाजीपाला, किराणा दुकाने व दूध संकलन सुरु ठेवले होते. पण कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रविवारी दक्षता समितीने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला . त्यामुळे सामान्य नागरिकानी समाधान व्यक्त केले . तसेच गावात बाहेरुन ९१ लोक आले आहेत . त्यानी १४ दिवस घरातून बाहेर पडू नये , अशा सुचना देण्यात आल्या आहेत . अत्यावश्यक सेवा म्हणून दररोज दोन औषध दुकाने सुरु राहतील . पण दूध संकलन बंद राहणार आहे . नवीन पुलावरुन जाणारा रस्ता बंद केला आहे . नेसरी रोडवर पोलिस बॅरिकेट लावण्यात आले आहेत . अत्यावश्यक सेवेसाठी जुन्या बंधाऱ्यावरून मार्ग खुला ठेवला आहे . बाजारपेठेतून फेरफटका मारणाऱ्या वाहनांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे . त्यामुळे आज पहिल्या दिवशी गाव बंदचे चित्र बघायला मिळाले . सकाळी ग्रामपंचायतीने माईकवरुन ग्रामस्थाना सुचना केल्या . कोवाड बंदचा निर्णय झाल्याने शेजारच्या गावानीही आपापली गावे पर्णता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


..........

No comments:

Post a Comment