चंदगड बोलीतील शब्दसंग्रह पाठविण्याचे आवाहन – प्रा. नंदकुमार मोरे - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2020

चंदगड बोलीतील शब्दसंग्रह पाठविण्याचे आवाहन – प्रा. नंदकुमार मोरे

प्रा. नंदकुमार मोरे
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगडी बोलीचा युजीसी, नवी दिल्ली पासून महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सह) अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. ईयत्ता दहावीच्या कुमारभारती या पाठ्यपुस्तकातही समावेश होता. मात्र  चंदगड बाहेरील शिक्षक व विद्यार्थींसाठी अध्ययन-अध्यापनासाठी संदर्भ साधने उपलब्ध नाहीत. त्या अनुषंगाने तयारीचा भाग म्हणून चंदगडी बोलीवरील दोन स्वतंत्र ग्रंथांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ती लवकरच प्रकाशित होतील. या ग्रंथांमध्ये काही गोष्टी राहू नयेत यासाठी आपण आपला सहयोग देण्याचे आवाहन प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.      
सद्या सर्वजन कोरोनामुळे आता स्थानबद्ध आहेत. हे घरी बसण्याचे संकट कधी संपेल याबद्दल कोणीच ठाम सांगू शकत नाही. तर हाती असलेल्या वेळेचा थोडा सदुपयोग करून चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह आणि इतर वैशिष्ट्यांबाबत विचार करा. संपूर्ण कुटुंब एकत्र बसता त्यावेळी याबद्दल चर्चा करून तुम्ही योगदान देऊ शकता. असे प्रा. मोरे यांनी सांगितले आहे. आपल्याला सुचविलेला शब्दसंग्रह पुढिल व्हॉटस् अप किंवा मेल वर पाठवावा Whatsapp: 9422628300, Email: bhashavikas@gmail.com असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment