हेरे येथील देव माटेश्वराची मंगळवारी होणारी यात्रा रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2020

हेरे येथील देव माटेश्वराची मंगळवारी होणारी यात्रा रद्द


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड, कोल्हापूर, दोडामार्ग,सह बेळगाव जिल्ह्यातील भक्ताचे श्रद्धास्थान असलेले हेरे (ता. चंदगड) येथील श्री माटेश्वराची मंगळवार 24 मार्च 2020 रोजी होणारी वार्षिक यात्रा गर्दीमुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने रद्द केल्याची माहिती सरपंच पंकज तेलंग यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


No comments:

Post a Comment