हलकर्णी फाट्यावरील बाजारपेठ तीन दिवस बंद, ग्रामपंचायत व व्यापारी मंडळाचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2020

हलकर्णी फाट्यावरील बाजारपेठ तीन दिवस बंद, ग्रामपंचायत व व्यापारी मंडळाचा निर्णय


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
राज्यभरात वाढत चाललेला कोरोणाचा प्रार्दुभाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील बँका व मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार १ एप्रील ते ३ एप्रील २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपचांयत हलकर्णी व हलकर्णी फाट्यावरील व्यापारी मडंळातर्फे घेण्यात आला आहे. 
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणुन ओळख असणाऱ्या हलकर्णी फाटयावर संचारबंदी काळातही लोकांची वर्दळ सुरु होती. त्यातच बाहेरगावाहुन आलेल्या व्यक्तीही बिनधास्त फिरताना दिसु लागल्या .त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सागंण्यात आले. मेडीकल व डॉक्टर वगळता सर्व सेवा तिन दिवस बंद राहणार आहेत. त्याचबरोबर बाहेरूण येणाऱ्या व्यक्तिना बंदी घातली आहे.

No comments:

Post a Comment