देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थानची दवणा यात्रा रद्द, देवस्थान व यात्रा कमिटीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2020

देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थानची दवणा यात्रा रद्द, देवस्थान व यात्रा कमिटीचा निर्णय

देवरवाडी येथील श्रीक्षेत्र वैजनाथ
कालकुंद्री (प्रतिनिधी) 
देवरवाडी (ता. चंदगड) येथील श्रीक्षेत्र वैजनाथ ची दवणा यात्रा रद्द झाल्याची माहिती बसवराज पुजारी यांनी दिली. ही वार्षिक यात्रा या वर्षी सात एप्रिल रोजी भरणार होती.  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांच्या आदेशानुसार सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे.  दरवर्षी दवणा यात्रेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविक उपस्थित असतात तथापि सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना महामारी मुळे  यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी यात्राकाळात उपस्थित राहू नये असे आवाहन देवस्थान व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment