किराणा दुकानदारांनी जादा दराने मालाची विक्री करु नये, अन्यथा कारवाई - जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2020

किराणा दुकानदारांनी जादा दराने मालाची विक्री करु नये, अन्यथा कारवाई - जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके


कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी किराणामाल दुकानदार यांना जाहीरपणे कळविण्यात येते की आपल्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू व गृह उपयोगी वस्तू या प्रचलित असणाऱ्या दरानेच विक्री करावयाच्या आहेत जादा दराने विक्री करण्याची नाही तसेच दुकानांमध्ये माल असताना माल संपला आहे असे ग्राहकांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर दत्तात्रय कवितके यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment