कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालूक्यातील ग्रामपंचायतीनी केली औषध फवारणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालूक्यातील ग्रामपंचायतीनी केली औषध फवारणी




चंदगड / प्रतिनिधी
कोरोना या महारोगाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे . राज्य लॉकडाऊन केले असतानाच जिल्हा,तालुका आणि गावापर्यंत सर्वच व्यवहार बंद करण्याचे प्रयत्न सर्व पातळीवरू सूरू आहेत.
या पार्श्वभूमीवर चंदगड तालूक्यातील ग्रामपंचायतीनी गावबंदी करत सर्व गावकऱ्यांना माहिती देण्याचे स्वच्छतेसाठी धूरफवारणी, पावडर फवारणी करण्याचे उपाय योजले आहेत. चंदगड नगरपंचायतीसह, तूर्केवाडी, कारवे, गूडेवाडी, कूदनूर, डूक्करवाडी, कोवाड, माणगाव, म्हाळेवाडी, राजगोळी, मांडेदूर्ग, शिनोळी, राजगोळी, तूडये, शिवनगेकर, कागणी, ढोलगरवाडी, नागनवाडी, कानूर, अडकूर, गवसे, तेऊरवाडी, बागिलगे आदीसह तालूक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी मोठ्या प्रमाणावर औषधाची फवारणी सुरू केली आहे. या औषध फवारणीसाठी काही ग्रामपंचायतीनी स्वत: यंत्राची निर्मिती केली आहे. यासाठी टॅक्टरवर पाण्याचा टँकर, त्याला जोडून कॉम्प्रेसर आणि कॉम्प्रेसरच्या सहाय्याने फवारा मारणाऱ्या पाईप अशी ही यंत्रणा तयार केली.तर मांडेदूर्ग व माणगाव येथे तरूणांनी पंपाद्वारे औषध फुलराणी केली. या यंत्रणेमळे वेगाने फवारणीकेली जात आहे .यामध्ये हायड्रोक्लोराइड, टीसीएल आणि आरोग्य विभागाने दिलेल्या जंतुनाशक मिसळून फवारणी केली जात आहे.


No comments:

Post a Comment