चंदगड / प्रतिनिधी
संचारबंदी काळात वाहन घेवून फिरणाऱ्यांना चंदगड पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील नऊ वाहनांना देखील जप्त करण्यात आले आहे. होम कॉरटाईन असताना बाहेर फिरत असल्याने दोन जणांच्यावर गुन्हे दाखल करुन नऊ जणांना चंदगड येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत संचारबंदी काळात 188 कायद्यानुसार चंदगड पोलिसांनी अकरा गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी काळात एक दुचाकीवर व आठ चारचाकी गाड्याच्यावर चंदगड पोलिसांनी कारवाई केली आहे.
करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारच्या वतीने बाहेरगावाहून आलेल्यांना होम कॅरंटाईन रहाण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून या आदेशाचे उल्लघन झाल्याने चंदगड पोलिसांनी अशा नागरीकांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे भविष्यात बाहेर पडणाऱ्यांना धडा घेता येईल. चंदगड आरोग्य विभागाच्या वतीने राजगोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्वे येथील उपकेंद्र व पाटणे फाटा येथील सरकारी आय. टी. आय. प्रशिक्षण संस्थेची इमारत भविष्यातील धोका ओळखून विलगीकरण केंद्रे म्हणून नियोजन केले आहे. सोमवारपासून चंदगड शहरात बँका, औधष दुकान व दुध वगळता अत्यावश्यक सेवेतील किराणा व भाजीही गेले तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment