कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जनजागृतीत आघाडी घेतलेल्या कालकुंद्री, ता चंदगड येथे प्राथमिक शिक्षकांनी संपूर्ण गावात साबण, हँडवॉश व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज चे वाटप केले. कालकुंद्री येथे सुमारे ५० शिक्षकांच्या शिक्षक संचयनी मंडळा मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला. साहित्य वितरणाची सुरुवात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज, हँडवॉश, साबण देऊन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच सुरेश नाईक, ग्रामसेवक व्ही. बी. भोगन, बाळू मुर्डेकर, पांडुरंग गायकवाड, कल्लाप्पा पाटील, ईश्वर वर्पे, शशिकांत सुतार, उत्तम कोळी, दूधाप्पा पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते. गेल्या चार दिवसात ग्रामपंचायतने आवाहन केल्यानंतर विविध देणगीदार, टेलर व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून घरोघरी मास्क चे वाटप करण्यात आले. कोरोनाला रोखण्यासाठी बाहेर न फिरता सर्वांनी घरी राहावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
30 March 2020
Home
chandgad
कालकुंद्री येथे प्राथमिक शिक्षकांकडून ग्रामस्थांना हॅडवॉश, साबण, हॅडग्लोव्ह्जचे वाटप
No comments:
Post a Comment