गावपातळीवरील कमिट्यांनी कठोर भुमिका घेण्याची गरज
संपत पाटील, चंदगड
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वांधिक रुग्ण असून हा आकडा वाढता आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फैलावत चाललेल्या चेनला ब्रेक करण्याची गरज आहे. यासाठी संपुर्ण देशात लाकडाऊन केला आहे. तरीही बाहेरुन आलेल्या नागरीकांनी सतर्कता न बाळगत नाहीत. प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना चौदा दिवस कॉरंटाईन होण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून या सुचनेचे पालन होताना दिसत नसल्याने गावातील लोक भितीच्या छायेखाली आहेत. यासाठी गावपातळीवर कमिटी स्थापन केली आहे. मात्र त्यांच्याशी नजरेतून सुटून हे लोक केवळ गावातच नव्हे तर बाहेरगावीही फिरत आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कमिट्यांनी कठोर भुमिका घेण्याची गरज आहे. बाहेरुन आलेल्या लोकांच्यामुळे गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या मनात भिती आहे.
तालुक्यातील अनेक लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षण व कामानिमित्त पुणे, मुंबई यासह राज्याबाहेरील शहरात काम करतात. काही लोक विदेशातही आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे बरेच लोक आपापल्या घरी पततत आहेत. घरी येण्यासाठी त्यांची त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तालुक्यातील चंदगड, माणगाव व कोवाड व अन्य ठिकाणी खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. या विषाणुची लक्षणे लगेच दिसत नसल्याने बाहेरुन आलेल्या सर्वच जणांना पुढील चौदा दिवस घरातच राहण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या आहेत. यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने गाव पातळीवर कमिटी स्थापन केली आहे. तरीही बाहेरुन आलेले हे लोक या गोष्टीचे पालन करताना दिसत नाहीत. बाहेरुन आलेले सर्व जणांना या विषाणुचा संसर्ग झाला आहे असे नाही. तर लांबून प्रवास करुन येत असताना अनेक लोकांशी संपर्क आलेला असतो. त्यामुळे या काळात एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास त्या व्यक्तीमुळे अनेक लोक धोक्यात येवू शकतात. याची खबरदारी म्हणून बाहेरुन आलेल्या लोकांना पुढील चौदा दिवस खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी सर्वांनी खबरदारी व विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बाहेरुन आलेले सर्वच लोक असे वागतात असे नाही तर जे लोक असे वागत आहेत. त्यांच्यावर सरकारी पातळीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
सुचनांचे पालन करणाऱ्यांना विनाकारण त्रास देवू नये
काही गावांमध्ये जिल्हाबाहेरुन व विदेशातून आलेल्या लोकांना संशयाने पाहिले जात आहे. रितसर तपासणी करुन आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन केल्यानंतरही अशा लोकांना स्थानिक नाकरीकांच्याकडून त्रास होत असल्याच्या घटना घडत आहेत. हे ही कोठेतरी थांबण्याची गरज आहे. जे लोक असे वागतात, त्यांच्या घरातील एखादा सदस्य या परिस्थितीत असा प्रसंग आल्यास ते असेच वागतील का? हा प्रश्न आहे.
विदेशातून 28 तर जिल्ह्याबाहेरुन सहा हजार लोक तालुक्यात दाखल - डॉ. खोत
देश-विदेशातून चंदगड तालुक्यातील विविध गावात आलेल्या लोकांची चंदगड ग्रामीण रुग्णांलय व त्या-त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्याकडून प्राथमिक तपासणी केली आहे. बाहेरुन आलेल्या लोकांना आल्यापासून पुढील 14 दिवस घरीच राहण्याच्या सुचना आहेत.
विदेशातून आतापर्यंत 28 तर देशातील विविध शहारातून जवळपास सहा हजार लोक चंदगड तालुक्यात आले आहेत. यातील दहा लोकांचे 14 दिवस पुर्ण झाले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले.
विदेशातून आतापर्यंत 28 तर देशातील विविध शहारातून जवळपास सहा हजार लोक चंदगड तालुक्यात आले आहेत. यातील दहा लोकांचे 14 दिवस पुर्ण झाले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment