कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून येणाऱ्या चारमान्यांच्यावर लक्ष, खबरदारीसाठी तपासणी आवश्यक - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून येणाऱ्या चारमान्यांच्यावर लक्ष, खबरदारीसाठी तपासणी आवश्यक


अशोक पाटील : कोवाड
कोरोनाच्या धास्तीने पुणे, मुंबई यासह मोठ्या शहरातून चाकरमनी आपापल्या गावी येऊ लागले आहेत . बाहेरुन येणाऱ्या या चाकरमन्यांच्यामुळे गावपातळीवर ग्रामस्थ खबरदारी म्हणून त्यांची आरोग्य तपासणी करुन त्याना स्वतंत्र राहण्याच्या सुचना देत आहेत . चंदगड तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक मुंबई , पुणे यासह मोठ्या शहरांतून नोकरीनिमित्त वास्तव्याला आहेत . पण आता कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने ३१ मार्च पर्यंत शाळाना सुट्टी जाहिर केली आहे . खासगी कंपन्याही बंद होत आहेत . मोठी शहरे बाजारपेठा बंद केल्या जात असल्याने नोकरदार लोक गावी परतू लागले आहेत . पण त्या अगोदरचं खेड्यातूनही लोकानी कोरोनाला प्रतिबंद करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांसह गर्दीची ठिकाणे बंद केली आहेत . खासगी वाहतूक बंद ठेवली आहे . कोवाड ग्रामपंचायतीने मंगळवार पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . प्रशासनाने तालुक्यातील आठवडे बाजार बंद करण्याच्या सुचना दिल्याने कोवाड , कुदनूर माणगांव , तुर्केवाडी , चंदगड , हेरे , अडकूर येथील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवले आहेत . अशा स्थितीत शहरांतून अनेक चाकरमनी आपापल्या गावी येऊ लागले आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून गावपातळीवर बाहेरुन आलेल्यांची  प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जात आहे . त्यांच्या नावांची नोंद ठेवून त्याना स्वतंत्र राहण्याच्या सुचना दिल्या आहेत . १४ दिवस ते घराबाहेर पडू नयेत याची ग्रामस्थ काळजी घेत आहेत . यामुळे गावी आलेल्या चाकरमन्यांची कोंडी झाली आहे . अगोदरचं राज्यात वाहतूक यंत्रणा कमी असताना मोठ्या अडचणी पार करत गावी पोहचलेल्या चाकरमन्यांच्यावर आता गावात प्रवेश मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत . कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त करत येणारे चाकरमनी आरोग्य विभागाशी संपर्क करून गावात येऊ लागले आहेत . यापूर्वी गावी आलेल्या चाकरमनी दरवाजे बंद करुन घरी आहेत . ग्रामस्थ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत . तसेच दररोज आरोग्य विभागाकडून त्यांची चौकशी केली जात आहे . जवळपास ४००लोकांची आतापर्यंत आरोग्य खात्याकडून तपासणी झाली आहे.

                                           देशा- विदेशातून गावात नवीन येणाऱ्याची चौकशी......
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन येणाऱ्या लोकांची गावात आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्याला स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्याचे गाव पातळीवर ठरले आहे . त्यानुसार प्रत्येक दिवशी गावात नवीन येणाऱ्या लोकांची चौकशी करून आरोग्य विभागाकडे त्यांची नोद केली जात आहे. विष्णू आडाव ( उपसरपंच कोवाड).

No comments:

Post a Comment