चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक नांदवडे शाळेने जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश केले. यामध्ये विद्यालयाच्या निकिता नामदेव मोरे 184 गुण (तालुक्यात दुसरा क्रमांक), आदर्श राजेंद्र कूट्रे 180 गुण (तालुक्यात चौथा क्रमांक), संजोग संतोष मळवीकर 174 गुण (तालुका गुणानुक्रमे सातवा क्रमांक), पल्लवी प्रशांत गावडे 164 गुण (तालुका गुणानुक्रमे बारावा क्रमांक), शुभम नारायण पवार 164 गुण (तालुका गुणानुक्रमे बारावा क्रमांक), आर्या संजय साबळे 158 गुण, वेदांत विजय गावडे 122 गुण मिळवून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, केंद्रप्रमुख सुभाष सावंत यांचे प्रोत्साहन केंद्रप्रमुख सुभाष सावंत, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी, शिक्षक आर. एन. पाटील यांचे बाबुराव गावडे, वैजनाथ देसाई, संजय ढेरे, संदीप म्हाडगूत, आसावरी बल्लाळ, सौ. सरिता इंगळे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment