राजपत्रित अधिकारी महासंघाकडून 100 पीपीई किट पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली. |
कोल्हापूर / प्रतिनिधी
आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर मात करत आहेत. अशा आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असणारे पीपीई किट्सचे 100 नग कोल्हापूर विभागाच्या राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आले.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या कल्पनेतून व कोल्हापूर विभागातील राजपत्रित अधिकारी महासंघाचे अधिकारी यांच्या सहकार्यातून हे 100 पीपीई किट किट खरेदी करून पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई , महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महासंघाचे उपाध्यक्ष संजय शिंदे, सचिव बजरंग मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे वस्तू व सेवा कर अधिकारी संघटनेचे सहसचिव राजकुमार पाटील, वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक राज्यकर आयुक्त राजेंद्र पाटील, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर अधिकारी कृषी अधिकारी तथा पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक अतुल जाधव, प्रवीण मगदूम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment