फाटकवाडी धरणाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे - माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2020

फाटकवाडी धरणाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे - माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील

भरमू पाटील
चंदगड / प्रतिनिधी
           फाटकवाडी (ता. चंदगड) येथील धरणाला मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या बाजूच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झाला होता.धरण फुटणार म्हणून घटप्रभा नदीच्या बाजूच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. अजूनही या नदीकाठावरील जनतेच्या मनात भीतीदायक चित्र आहे. यासाठी या धरणाची दुरूस्ती साठी आवश्यक असणारी  कामे या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. ते पूर्ण करावे व घटप्रभा नदीच्या काठावरील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केली आहे
          श्री. पाटील पूढे म्हणाले  दीड महिन्यात चंदगड तालुक्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.मागील वर्षी झालेल्या  झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यात शेती व घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे. फाटकवाडी धरणाला मुसळधार पावसाने धरणाच्या भिंतीलाच धोका निर्माण झाला होता. कित्येक कुटुंबाना भर पावसात स्थलांतर करावे लावले होते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती कामास तात्काळ प्रारंभ होणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीही100 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या धरण लाभक्षेत्रातील नागरिकांची काळजी वाढली आहे. या धरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती तात्काळ करावी व येथील नागरिकाना दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोरोना विषाणूंचे संकट जगभर आहे. त्या विरोधात सर्वानी एकजुटीने लढायला पाहिजेत. प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली पाहिजेत. हे संकट सर्वानी मिळून हद्दपार केले पाहिजेत. त्याचबरोबर पुढे येणारी आव्हाने सुद्धा पेलायला हवीत.त्यामुळे चंदगड तालूक्यातील नागरिकांना प्रशासनाला मदत करून घरीच राहून आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केले. 

No comments:

Post a Comment