![]() |
मिरची |
कोरोना विषाणूच्या फैलावाने देशासह राज्यात लाॅकडाऊन असल्याने बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकर्यानी पिकवलेली पिके शेतातच कुजून वाया जात आहेत. महापुरात उध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान आता रब्बी पिकातून ही भरून काढण्याच्या उद्देशाने केलेली रब्बी पिकेही शेतातच कूजल्याने चंदगड तालूक्यातील शेतकर्याचा दररोज लाखोंचा तोटा होत आहे सहा महिन्यांत दुसऱ्यावेळीही शेतकऱ्याचा माल भंगार झाला आहे.त्यामुळे तालूक्यातील शेतकर्यााच्या बिनीस,मिरची आदी पिकांचे जवळपास पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतात अलीकडे अत्याधुनिक पद्धतीने ग्रीन हाऊसमधून वेगवेगळी नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वळला असताना आलेल्या महा मारी संकटातून सावरणे आता मात्र जीवावर आले आहे. शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पिके उखडून टाकण्यास सुरुवात केली आहेत. तर काही ठिकाणी पिकांना पाणी देणेच सोडून दिल्याने करपून जात आहेत.
डिसेंबर - जानेवारी महिन्यांत रब्बी पिकांची लागवड केली जाते. ही पिके मार्च, एप्रिल, मे अखेर पर्यंत उत्पादन देतात. उत्पादन काळ सुरू असतानाच कोरोना चे आले आणि केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले.
तालुक्याच्या काही भागात कोबी भाजी केलेल्या शेतकऱ्यांनी दर नसल्याने पोल्ट्रीतील कोंबड्यांना खाद्य म्हणून घातले, पण कोंबड्यानाही दर नाही, सारा घाटा सहन करीत बळीराजा अक्षरशः आता रस्त्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात मुख्य ऊस, भात पिकांबरोबरच मिरची, भुईमूग, मका, बटाटे, कोबी, फ्लॉवर, नवलकोंब, बिनीस, वाटाणा, मसूर, चवळी यासारखी रब्बी पिके काढणीला आली असतानाच मोठं संकट आले आहे. या अधिक काळ न टिकणाऱ्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतात कुजून वाया जात आहेत. काही गावातून गोकुळ व इतर दूध डेअरी च्या शाखा बंद असल्याने जोडधंदा असलेला दूध व्यवसाय कोलमडला आहे. दुधाची पाण्यासारखी अवस्था झाली आहे. गायीचे दूध तर ओतून टाकावे लागत आहे.
No comments:
Post a Comment