चंदगड / प्रतिनिधी
देशात करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन आहे. असे असताना लॉकडाऊनबाबत सरकारच्या सर्व आदेशांचे व कठोर नियमांचे उल्लंघन करून महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते 20 एप्रिल 2020 रोजी झाले. यावेळी चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर व मुख्याधिकारी अभिजित लक्ष्मण जगताप हे उपस्थित होते. त्यामुळे तात्काल यांची तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने तपासणी करून संस्थात्मक विलिनीकरण करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे चंदगडचे गटनेते नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ``नगरपंचायतीच्या हद्दीत नवीन वसाहत मध्ये 20 एप्रिल 2020 रोजी करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतभर लॉकडाऊन आहे. तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील हे रेड झोन घोषित केलेल्या बेळगाव जिल्ह्यात राहण्यास आहेत. त्यामुळे आमदार पाटील हे करोना विषाणूचे वाहक असू शकतात अशी शंका आहे. बेळगाव येथून ते चंदगड येथे येऊन शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. या उद्घाटनावेळी आपल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. काणेकर व मुख्याधिकारी श्री. जगताप हे आमदार श्री. पाटील यांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना तसेच नगरपंचायतीचे इतर कर्मचारी व नगरसेवकांना करोनाच्या विषाणूची बाधा होऊ नये. या करिता काळजी म्हणून आपल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. काणेकर व मुख्याधिकारी श्री. जगताप यांना संस्थात्मक विलगीकरण करून ठेवावे अशी मागणी या निवेदनातून नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment