पोलीस मित्र म्हणून विनामोबदला काम करण्याची संधी द्या - चंदगड शिवसेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2020

पोलीस मित्र म्हणून विनामोबदला काम करण्याची संधी द्या - चंदगड शिवसेनेची मागणी

पोलीस मित्र म्हणून विनामोबदला काम करण्याची संधी द्या, या मागणीचे निवेदन देताना  शिवसेनेचे कार्यकर्ते. 
कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर  राज्यात 3 मे सर्वत्र संचारबंदी आहे.पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,सरकारी कर्मचारी यांच्यामार्फत संचारबंदी योग्य रीतीने होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण भागात पोलीसाची संख्या कमी आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाला मदत व्हावी यासाठी  स्वयंसेवक पोलिस मित्र म्हणून विनामोबदला काम करण्यासाठी परवानगी द्यावी अशा मागणी चे निवेदन  शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर यानी कोवाड पोलिसांना दिले आहे. 
चंदगड तालुक्याला बेळगाव जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.बेळगाव जिल्ह्यामधून तालुक्यात येण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून जिल्हाअंतर्गत सीमा ह्या बंद केल्या असून त्याठिकाणी खडा पहारा ठेवण्यात आला आहे.परंतु अनेक गावामध्ये आजही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.गेल्या काही दिवसात कारवाईचा बडगा उगारून सुध्या नागरिक गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे .अश्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाला मदत व्हावी या हेतूने चंदगड  शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या स्वयंसेवकांची पोलीस मित्र म्हणून नेमणूक करण्यात यावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.प्रशासनाकडून असलेल्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता संचार बंदीच्या नियमांचे पालन करत स्वेच्छेने काम करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment