कोवाड येथे पोलिसांकडून 13 दुचाकी वाहनावर धडक कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2020

कोवाड येथे पोलिसांकडून 13 दुचाकी वाहनावर धडक कारवाई

कोवाड येथे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई. 
कोवाड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्याची सीमा लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील कोरोणा बाधित रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभुमीवर तालुक्यामध्ये संचारबंदी असतानाही कोवाड (ता. चंदगड) बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कोवाड पोलीसांनी आज धडक कारवाई करून 13 दुचाकी वाहने  ताब्यात घेतली. या वाहनांवर संचारबंदी कलम 118 आदेशाचे उल्लंघन यासह अन्य कारणांसाठी गाड्या जप्त करून कारवाई केली आहे.
  बेळगावचा धसका घेऊन चंदगड तालूक्यामध्ये संचारबंदी अधिकच कडक केली आहे. पोलीसांनी देखील गस्त वाढविली आहे.कोवाड ही कर्यात भागातील आजूबाजूच्या खेड्यासाठीची जवळची बाजारपेठ असून बँका,शेती सेवा केंद्र, आणि अन्य काही कारणाने गर्दी वाढताना दिसून येत आहे .याचा फायदा घरी बसून कंटाळलेले लोक घेत असून डबल  सीट विनाकारण कोवाड बाजारपेठेच्या चकरा काढताना दिसत  आहेत.त्यात जिल्हा प्रशासनाने वाढत्या रुग्णामुळे संभाव्य धोका ओळखून अत्यावश्यक वाहनासाठी मोटर सायकल वर एक तर चार चाकी गाडीमधून  दोघांना प्रवास करता येईल असे निर्बंध लावले आहेत.अशा परिस्थितीत सुद्धा बाजारपेठेतील वाढती गर्दी ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.त्यामुळे आज सकाळच्या सत्रात कोवाड पोलिसांकडून बाजारपेठे मध्ये विनाकारण फिरत असणाऱ्या तब्बल 13 दुचाकी गाड्यांच्यावर डबल सीट, तीब्बल सीट ,लायसन्स नसणे  या कारणासाठी जप्तीची कारवाई केली.तसेच विनाकारण रस्त्यावर फिरल्यामुळे दुचाकीस्वारावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा प्रकारचे नागरिकांनी केलेले वर्तन हे बेजबाबदार असून चिंतेची बाब आहे.असे मत कोवाड दुरक्षेत्रचे एआयएस हंणमत नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. कोवाडचे एआयएस हणमंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष साबळे व मानसिंग चव्हाण यांनी ही कारवाई केली. या काईवाईने मात्र विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर वचक नक्कीच बसणार आहे. त्यामुळे या कारवाईचे गावातील नागरिकांनी मात्र स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment