चंदगड / प्रतिनिधी
गेल्या वर्षभरातील विविध परीक्षेतील सातत्यपूर्ण यशानंतर जानेवारी 2020 मध्ये घेणेत आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप {BDS }परीक्षेतही केंद्रीय प्राथमिक नांदवडे (ता. चंदगड) येथील शाळेचा यशाचा झेंडा पुन्हा उंचावला. इयत्ता चौथीच्या गोल्ड मेडल विनर यादीत तालुक्यातील फक्त नांदवडे शाळेचा समावेश आहे.
नांदवडे शाळेच्या इयत्ता चौथी 1 गोल्ड, 2 सिल्वर व 1 ब्रॉंझ असे मेडल मिळविले आहे. गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी - शुभम नारायण पवार (91 ℅). सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी - निकिता नामदेव मोरे (83 ℅) व आदर्श राजेंद्र कुट्रे (82 %). ब्रॉंझ मेडल प्राप्त विद्यार्थी - संजोग संतोष मळवीकर (77 %).
इयत्ता तिसरीमध्ये 1 गोल्ड तर 2 सिल्वर मेडल मिळविले आहे. गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी - अक्षता दिलीप पाटील (97 %). सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी - समृध्दी विजय पाटील (92 ℅) व तन्मय जयवंत पेडणेकर (90 %). यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्रशाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी, तिसरीच्या वर्गशिक्षिका सरिता इंगळे, चौथीचे वर्गशिक्षक आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार व केंद्रप्रमुख सुभाष सावंत प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment