लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्यातही कोवाड बाजारपेठ 3 मे पर्यंत बंद राहणार, ग्रामस्तरीय दक्षता समिती व व्यापारी संघटनेचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2020

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्यातही कोवाड बाजारपेठ 3 मे पर्यंत बंद राहणार, ग्रामस्तरीय दक्षता समिती व व्यापारी संघटनेचा निर्णय

कोवाड / प्रतिनिधी   
जगभरात कोरोना रोगाने धुमाकूळ घातला असून चंदगड तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा आकडा वाढत चालला आहे.अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेली कर्नाटक सीमा, कोवाड बाजारपेठ बंद असून लॉक डाऊन च्या दुसऱ्या टप्यातही  पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापारी व  ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये घेण्यात आला.
यामध्ये गावातील दूध संस्था ,अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने  बंद राहणार आहेत . किराणा दुकाने  फक्त सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत चालु राहतील.तरी चा आदेशाचे कोणी  उल्लंघन करून दुकाने चालू केल्यास कायदेशीर कारवाई करून  गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.शेती सेवा केंद्र यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना साहित्य देण्याचे ठरले.अवघ्या 8 किलोमीटर वर बेळगुंदी तसेच बेळगाव मधील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती उपसरपंच विष्णू आडाव,आणि व्यापारी संघटना अध्यक्ष दयानंद सलाम यांनी दिली.त्यामुळे सर्व व्यापाऱ्यानी नियमांचे कठोर पालन करून कोरोना विरुद्ध च्या लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन हे दक्षता समितीमार्फत केले आहे. 
जनता कर्फ्यू पासून बाजारपेठ बंद ठेऊन व्यापारीवर्गाने आजवर संचार बंदीचे तंतोतंत पालन केले आहे,20 एप्रिल पासून लोकडाऊन च्या अंमलबजावणीतुन कार्यालयांना,कारखान्यांना,अस्थापनांना सोशल डिस्टन्स सारख्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून चालू  करण्यात येणार होते. परंतु तसे आदेश  आलेले नसून प्रशासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत 3 मे पर्यंत लॉकडाऊन चे पालन करण्यात यावे, असे आवाहन कोवाडचे मंडल अधिकारी आपासो जिनराळे आणि तलाठी दीपक कांबळे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment