रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजूंना तुर्केवाडी येथील व्यापाऱ्याची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2020

रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजूंना तुर्केवाडी येथील व्यापाऱ्याची मदत

गरजू 11 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या वस्तुचे वाटप
मजरे कार्वे / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांचा विचार करून तुर्केवाडी येथील व्यापारी विजय दिनकर कुडतुरकर यांनी सामजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंच्या मदत देऊ केली. गरामपंचयतीच्या पुढाकाराने गावातील 11 गरजूंना दैनंदिन गरजेचे किराणा साहित्याचे सोशल डिस्टनसिंग पाळत वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच रुद्राप्पा तेली, तलाठी गणेश ठोसरे, ग्रामसेवक अशोक पाटील, पोलीस पाटील माधुरी कांबळे, सदस्य जोतिबा गावडे, भरमाना अडकुरकर उपस्थित होते.
एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे घरात राशन नसल्याने उपासमारीची वेळ आशा दुहेरी संकटात अनेक कुटुंबे सापडली आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत करण्यात आला. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. लोकडाऊन असल्याने हाताला काम नाही, त्यामुळे या कुटुंबांची गरज ओळखून विजय कुडतुरकर यांनी स्वतःहून पुढे येत गावातील 11 कुटुंबाना आपल्या किराणा दुकानातील साहित्याचे किट मदतस्वरूपात दिले. त्यांच्या या सहकार्याने या गरजूंचा तात्पुरता प्रश्न मिटला आहे. विजय कुडतुरकर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे गावात कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment