दड्डी येथील चेक नाक्यावर असलेला बंदोबस्त. |
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या घातक रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कर्नाटक - गोवा राज्यातून चंदगड तालुक्यात प्रवेश करणाऱ्या मार्गावर आंतरराज्य सिमेलगतच्या चंदगड तालूक्यातील काही हायस्कूलमधील १२ माध्यमिक शिक्षकांचा समावेश तपासणी पथकात करण्यात आलेला आहे . त्यामूळे माध्यमिक शिक्षक आता पोलीसांच्या भूमिकेत देशसेवा करत आहेत.
राज्यात लॉक डाऊन चालू झाल्यानंतर दि १५ एप्रिल २o२oपासून माध्यमिक शिक्षकांची नियूक्ती दड्डी , शिनोळी व कोदाळी येथील चेकनाक्यावर लावण्यात आली आहे . येथे दिलेल्या वेळेत बंदोबस्त कामकाज पार पाडण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत .कोरोनाच एक भयंकर संकट सर्वासमोर उभं राहिलेलं आहे . यामध्ये डॉक्टर्स , पोलिस ,नर्सेस , आरोग्यसेविका , अंगणवाडी सेविका,यांचे कार्य व योगदान उतुलनीय आहेच . त्यामध्ये आंतरराज्य सिमा तपासणी नाका पथकात माध्यमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे . पण सदर शिक्षकांना कोणतेही प्रशिक्षण नाही .ओळखपत्र , गणवेश ,नाहीत . त्यातच १०वी व १२वीचे बोर्ड परीक्षेच्या उत्तर तपासणीचे कामकाज आहे . यामध्येच आतंरराज्य सिमा तपासणी नाका पथकात रात्री ८-००ते सकाळी ८- ०० व सकाळी ८-००ते रात्री ८-००पर्यंत बारा -बारा तासांची अखंड ड्यूटी१५ /०४ / २०२०पासून करण्यासाठी आदेश प्राप्त झालेले आहेत आणि सदर आदेश हे फक्त १२ शिक्षकांसाठीच आहेत आणि तेही विना प्रशिक्षण . चंदगड तालूक्यात ७२ शाळा असून त्यातील इतर काही शिक्षकांनाही रोटेशन पद्धतीने एक -दोन दिवसासाठी ५ते ६ तासासाठी आदेश काढले असते तर सर्वांनाच हे कोरोनाच संकट दूर करण्यासाठी आनंदाने सहभाग घेऊन हातभार लावला असता व सदर १२ शिक्षकही तणावमुक्त राहिले असते . कोरोनाच्या लढ्यासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या यादीमध्ये आता माध्यमिक शिक्षकही आहेत . पण या तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना विशेषतः माध्यमिक शिक्षकांना कोणतेच संरक्षण नाही . इतर कर्मचाऱ्याप्रमाणे माध्यमिक शिक्षक सुद्धा रोज रात्री १२ तास ड्यूटी करत आहेत. यामूळे या सर्वाना सुविधा देण्याची मागणी चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment