मोलमजुरी करून जगणाऱ्या राठोड,नाईक कुटूंबीयांना कुट्रे परिवाराकडून मदत - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2020

मोलमजुरी करून जगणाऱ्या राठोड,नाईक कुटूंबीयांना कुट्रे परिवाराकडून मदत

तेऊरवाडी / प्रतिनिधी
विजापूर व बागेवाडी व रून मोलमजुरी करून जीवन  जगण्यासाठी किणी ( ता. चंदगड ) परिसरात  आलेल्या राठोड व नाईक  या कुटुंबाना किणी येथील कुट्रे  परिवाराकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन माणूसकी जपण्याचा प्रयत्न केला .
   परप्रांतीय लोक किणी - कोवाड परिसरात वास्तव्यास आहेत.पण कोरोनाच्या लॉकडाऊनमूळे सर्व कामे ठफ्फ झाल्यामुळे त्यांना मोलमजुरी मिळणे कठीण झाले आहे तर अशा लोकांना  त्यांना गावी जाणेही अशक्य झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .हे ओळखून माजी सरपंच  एम एम कुट्रे  त्यांचे चिरंजीव संजय कुट्रे यांच्या कुंठुबीयाकडून जीवनोपयोगी साहित्य देण्यात आले. या मदतीमुळे राठोड व नाईक कुटुंबाच्या डोळ्यात समाधान दिसून आले. या प्रसंगी बंडू लोबो,संभाजी मनवाडकर, गजानन मनगूतकर आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment