![]() |
धनगरी वेशात चंद्रकांत गावडू पाटील हे कोरोना विषयी जनजागृती करताना |
सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे थैमान चालू आहे.महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . यामूळे शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. अशा परिस्थितीत जिथे शासन पोहचत नाही अशा गल्लोगल्ली धनगरी वेशात जाऊन निट्टूर (ता. चंदगड) येथील चंद्रकांत गावडू पाटील यानी कोरोनाविषयी केलेली जनजागृती चर्चेचा विषय ठरली आहे .
निट्टुर गावचे सुपुत्र चंद्रकांत गावडू पाटील यांनी धनगरी वेशभूषा करून सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधत कोरोना संबंधी जनजागृती करण्याचे काम केले. ते स्वतः मुंबईहून आल्यावर 21 दिवस घरात विलागिकरन करून राहिले आणि आता समाजात ते मास्क वापरा, साबण लाऊन हात धुवत रहा, विनाकारण घरा बाहेर पडू नका, शक्य तेवढी काळजी घ्या असे संदेश ते धनगर वेशभूषेत गावातील गल्लीबोळात फिरून ओरडून लोकांना सांगत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वेशभूषा का केली तेही सांगितले. ते म्हणाले, धनगर हा गावोगावी उन्हातान्हात फिरणारा माणूस, घरापासून लांब राहणार, रानावनात भटकणारा आणि आडानी, कमी शिकलेला. मी धनगर स्वतः माझ्या घरी राहू शकत नाही निदान तुम्ही तरी तुमच्या घरात आहात, त्यामुळे घरातच रहा असा संदेश देण्याचा मी प्रयत्न करत असून शिकल्या सावरलेल्या लोकांनी तरी निदान सरकारच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती ते करत आहेत . त्यांच्या या कार्याला समस्त निट्टुर ग्रामस्थांनी कौतूक केले आहे.
No comments:
Post a Comment