![]() |
लाॅकडाऊनच्या पंधरा दिवसानंतर झालेली बागिलगे येथील माय लेकराची भेट. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी (एस. के. पाटील)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे.कर्नाटक राज्यामधील वाढत्या रुग्णांच्या भितीपोटी आंतरराज्य सीमाबरोबर जिल्ह्यांतर्गत सीमा बंद केल्या आहेत.
अशा परिस्थितीत बेळगामध्ये आई तर महाराष्ट्रातील चंदगड तालूक्यातील बागीलगे येथे ताटातूट झालेला तीन वर्षाचा मूलगा चि . दक्ष आईच्या कुशीत जाण्यासाठी गेले पंंधरा दिवस व्याकुळलेल्या बागीलगे येथील दक्षची भेट काल शिनोळी नाक्यावर महिन्यानंतर झाली आणि माय लेकरांच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू अगदी ओसंडून वाहू लागले.
जनता कर्फ्यूच्या आधीच्या दिवशी बागीलगे येथील सौ.स्नेहल मोहन गोविलकर ह्या साहित्य आणण्यासाठी आपल्या मुलाला घरीच आजी - आजोबा जवळ ठेऊन बेळगावला गेल्या होत्या.जनता कर्फ्यूनंतर लगेच लॉकडाऊन ची घोषणा झाल्यानंतर कर्नाटक - महाराष्ट्र सिमा लॉक केल्याने त्या बेळगावला आपल्या माहेरी कडोलकर गल्लीमध्ये अडकून राहिल्या आणि मुलगा दक्ष हा बागीलगे येथे राहिला .लॉकडाऊन मुळे सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे माय लेकरांची ताटातूट झाली.त्यात स्नेहल चे पती मोहन गोविलकर भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत . असल्यामुळे मुलगा दक्ष हा आजी आजोबाजवळ तर स्नेहल माहेरी बेळगावला अडकून राहिल्या.
अशा परिस्थितीत दक्ष हा लहान असल्यामुळे सौ . स्नेहल यांचे सगळे लक्ष हे मुलाच्या ओढीने बागीलगे कडे होते. यामध्येच बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडल्याने सिमा भागातील बंदोबस्त एकदम कडक करण्यात आला . त्यामूळे मुलाला भेटण्याची तीव्र असूनही दक्षची भेट होत नव्हती . सर्वांचे डोळे 14 ला संपणाऱ्या लॉकडाऊन च्या तारखेकडे होते ,परंतु रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत पुढे वाढविण्यात आला ,तसा त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि मुलाच्या काळजीने अधिक व्याकुळ होऊन काही मार्ग निघतो का यासाठी त्यांची धडपड सुरू झाली .
अशा परिस्थितीत हेल्प फॉर निडी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले.या संस्थेचे संचालक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर व अमृत बिर्जे,संदीप तरिहाळकर सह वृत्तपत्र पत्रकारानी बेळगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करून माय लेकरांची भेट घडविण्याचे ठरविले.
त्यानुसार आजोबा दक्षला आपल्या खांदयावरून शिनोळी चेक पोष्ठ वरून दिड कि . मी . अंतर चालत बाची चेक पोस्ट वर आले तर बेळगाव वरून सौ. स्नेहल याना बाची चेक पोष्ठ वर आणण्यात आले .दोघांची वैद्यकिय तपासणी करून दक्षला सौ. स्नेहलकडे सुपूर्द करण्यात आले. शेवटी लाॅकडाऊनच्या पंधरा दिवसानंतर एकमेकांची भेट घडवून आली. पंधरा दिवसानंतर भेटलेल्या आईला पाहून दक्षच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावर उरला नाही.तर उपस्थित सर्वांचेच डोळे मात्र या माय- लेकरांची भेट पाहून पाणावलेले चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले.
No comments:
Post a Comment