`आम्ही म्हाळेवाडीकर ' व्हॉटसॲप ग्रुपच्या वतीने गावात सॅनिटायझर व साबण देवून कोरोनाबाबत जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2020

`आम्ही म्हाळेवाडीकर ' व्हॉटसॲप ग्रुपच्या वतीने गावात सॅनिटायझर व साबण देवून कोरोनाबाबत जनजागृती

म्हाळेवाडी :येथे आम्ही म्हाळेवाडीकर  ग्रुपचे सदस्य गावकऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप करताना.
माणगाव / प्रतिनिधी
म्हाळेवाडी येथे 'आम्ही म्हाळेवाडीकर ' या व्हॉटसॲप ग्रुपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावाला सॅनिटायझर व एक साबण देवून  कोरोनाबाबा घरोघरी जनजागृती केली. ग्रुपच्या सदस्यानी ग्रामस्थाना घराबाहेर पडू नका, अशा सुचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले. करोनाच्या संकट प्रसंगी व्हॉटसअॅप ग्रुपने सोशल मीडियासमोर आदर्श ठेवला आहे.
म्हाळेवाडी येथील युवकानी  गावच्या सामाजिक कार्यासाठी व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. ग्रुपमध्ये गावातील ८६ युवक सदस्य आहेत. व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांना नेहमी विधायक कार्यासाठी एकत्र केले जाते. दोन लाख साठ हजारांचा निधी खर्च करुन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गावच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न यामाध्यमातूनचं सोडविला आहे.. गावातील प्रकाश पाटील या युवकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी व्हॉटसॲप ग्रुपने महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचीही जबाबदारी घेतली आहे. यासह नेहमी गावच्या सामाजिक कार्यात ग्रुपचे सदस्य सक्रीय भाग घेत असतात. सध्या कोरोनाचे संकट देशासमोर उभे आहे. ३मे पर्यंत लॉकडाउन आहे. सरकारकडून नागरिकाना खबरदारीचे आवाहन केले जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांच्यातून भिती व्यक्त आहे. त्यामुळे . 'आम्ही म्हाळेवाडीकर ' ग्रुपच्या सदस्यानी कोरोनाबाबत गावात जनजागृती सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सदस्यानी वर्गणी काढून संपूर्ण गावाला सॅनिटायझर व एक साबण दिला आहे. घरातून बाहेर गेलेल्या व्यक्तिनी हाताला सॅनिटायझर लावल्याशिवाय घरात प्रवेश करु नये, अशी सक्ती केली असून तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचनाही दिल्या जात आहेत.

चंदगड मतदार संघाचे आमदार संघाचे आमदार राजेश पाटील यांचे म्‍हाळेवाडी हे गाव आहे .गावातील युवकानी व्हॉटसप ग्रुपच्या माध्यमातून कोरणाबाबत जनजागृतीचे जे कार्य चालू ठेवले आहे.याबाबत त्यांनी ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक केले.No comments:

Post a Comment