![]() |
किणी येथे मास्कचे वाटप करताना वसंत सुतार, पोलिस पाटील रणजित गणाचारी, संदिप गणाचारी. |
किणी (ता. चंदगड) येथील परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून किणी गावाला 400 मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोणा पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील दक्षता कमिटी व विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींना प्रथम मास्क वाटण्यात आले त्यानंतर घरोघरी मास्क वाटण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी संदिप गणाचारी, प्रविण गणाचारी, रणजित तरवाळ, कोरोणा दक्षता कमिटीचे अध्यक्ष वसंत सुतार पोलिस पाटील रणजित गणाचारी, मारुती हान्नूरकर, निंगाप्पा मोटुरे, फिरोज मुल्ला, समीर मुल्ला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment