उपासमारीची वेळ आलेल्या नाभिक समाजाला सरकारने आर्थिक मदत द्यावी - जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रसाद वाडकर - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2020

उपासमारीची वेळ आलेल्या नाभिक समाजाला सरकारने आर्थिक मदत द्यावी - जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रसाद वाडकर

प्रसाद वाडकर
चंदगड / प्रतिनिधी
      करोना विषणुचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे सरकारी आदेशानुसार नाभिक समाजाने संपूर्ण व्यवसाय बंद ठेवला आहे. यामुळे समाजातील अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने सरकारने या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी नाभिक समाज संघटनेचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रसाद वाडकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून सरकारकडे केली आहें.
    नाभिक समाज हा बारा बलुतेदारापैकी एक असून केशकर्तनालयाच्या व्यवसायातूनच आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. परंतु करोना या महाभयंकर विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहें. त्यामुळे सरकारी आदेश, सुचना पाळत सर्वांनी कडकडीत बंद पाळला आहे. नाभिकांची दुकाने बंद असल्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नागरिकांतून घरोघरी बोलवणे येत आहेत. परंतु संचारबंदीच्या काळात ते शक्य  नाही. त्यामुळे या दोन्ही कचाट्यात सापडलेला नाभिक समाजाला अनेक अडचणींना तोंड देत आहे. यावर लवकरात लवकर सरकारने सुचना देऊन नाभिक समाजातील बांधवांची उपासमार थांबवावी व आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी नाभिक समाजाचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रसाद वाडकर यांनी सरकारकडे केली आहे. 


No comments:

Post a Comment