दौलत-अथर्व ची संपूर्ण ऊस बिले शेतक-यांच्या खात्यावर जमा - मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2020

दौलत-अथर्व ची संपूर्ण ऊस बिले शेतक-यांच्या खात्यावर जमा - मानसिंग खोराटे

मानसिंग खोराटे
चंदगड / प्रतिनिधी
             सन 2019-20 या चालू हंगामात दौलत-अथर्व मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे संपूर्ण बील शेतकर्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्व अध्यक्ष मानसिंग खोराटे यानी दिली. 
दौलत कारखाना काही तांत्रिक अडचणी मूळे उशीरा सुरू होऊनही शेतकर्यानी कारखान्यावर विश्वास ठेवून आपला संपुर्ण उस कारखान्याकडे गाळपास पाठवीला होता अशा शेतक - यांचे बिले वेळेत देणेचे नियोजन कारखाना प्रशासन केले होते,परंतू लॉकडाउन मुळे कर्मचारी हजर नसलेने अनंत अडचणी असतांना देखील लॉकडाउनच्या काळात शेतक-यांना मदत करणेचा उदात हेतु ठेवून अथर्व दौलत कारखान्याने सर्व उसाची बिले शेतक - यांचे खातेवर वर्ग केलेली आहेत. 
                दौलत कारखाना तालूक्यातील गोरगरीब जनतेची जाण आहे,त्यामूळे कारखान्यास सुरवातीपासूनच चंदगड तालूक्यातील शेतकर्यानी भरभरून मदत केली आहे.यावर्षी मशनिरीच्या अडचणीमुळे कारखाना गाळपामध्ये कमी पडला आहे. परंतु चंदगड तसेच कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील शेतक - यांनी देखिल आपला जास्तीत जास्त अस कारखान्याकडे गाळपास पाठविलेला आहे .याचा विचार करून अथर्व चे अध्यक्ष  खोराटे यांनी आपले अथर्व-दौलत प्रशासनाने कारखान्याकडे अलेल्या संपुर्ण उसाची बिले शेतक - यांचे बँक खातेवर वर्ग केलेली आहेत. कारखान्याकडे आलेल्या संपुर्ण ऊसाची बिले अदा करणारा कोल्हापुर विभागातच नव्हे तर महाराष्ट्रात त्याचबरोबर देशामध्ये आपला कारखाना प्रथम असल्याची शक्यता वर्तविली त्याचप्रमाणे येथुन पुढील हंगामात देखील ऊस उत्पादक तसेच इतर बिले वेळेत देणेचा प्रयत्न असनार असल्याचे सांगीतले तसेच पुढील हंगाम पुर्ण क्षमतेने घेणेची तयारी करणार असलेची माहिती दिली . कारखाना या हंगामात आलेल्या अडचणीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घेतले असून त्यांचे मार्गदर्शनानुसार ऑफ सिझन कालावधीतील कामे केली जाणार आहेत त्यामुळे पुढील हंगामात या हंगामाप्रमाणे कोणत्याही अडचणी राहणार नाहीत याची खबरदारी घेणार असलेचे सांगितले तसेच पुढील हंगाम पुर्ण क्षमतेने घेतला जाणार असलेने शेतक - यांनी कोणताही विचार डोक्यात न ठेवता आपण पिकविलेला संपूर्ण उस कारखान्याचे गट ऑफिसकडे नोंदविणेचा आहे . नोंद केलेला संपुर्ण अस कारखान्याकडे गाळपासाठी आणनेचे नियोजन कारखाना व्यवस्थापन करत असलेचे सांगितले तसेच देशावार आलेल्या कोरोना महामरीच्या संकटावर मात करणेसाठी सर्वानी सुरक्षित घरी राहुन प्रशासनास सहकार्य करणेचे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment