किणी ग्रामपंचायतीकडून नियमांचे काटेकोर अंमलबजावणीचे दुकानदार व नागरिकांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2020

किणी ग्रामपंचायतीकडून नियमांचे काटेकोर अंमलबजावणीचे दुकानदार व नागरिकांना आवाहन



कोवाड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे गुरुवार दि. 26 रोजी गावामध्ये किराणा दुकानदार व पिटाची गिरणीच्या मालकांना भेटून त्यांना वेळ ठरवून दिलेल्या कालावधीत दुकान व पिठाची गिरण चालू करण्या संदर्भात सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व कोरोना बचाव कमिटी सदस्यांनी गावात फिरून पत्रक देऊन जनजागृती केली. 
बरेच दिवस आपण कोरोना संसर्गापासून आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करताना आपण पाहत आहोत. तसेच प्रयत्न पोलीस व गावपातळीवर ग्रामपंचायती मार्फत गावा-गावात कोरोना बचाव कमिटी स्थापन करून गावामध्ये कोरोना व्हायरस होऊ नये यासाठी जनजागृती लोकांमध्ये करण्याचे काम केले जात आहे. हि जनजागृती करण्यासाठी सरपंच वसंत सुतार, ग्रामपंचायत सदस्य वसंत जोशीलकर, यल्लापा तरवाळ, संजय कुट्रे, निगंlप्पा मोटुरे, संदीप बिर्जे,पोलीस पाटील रणजित गणाचारी व ग्रामसेवक बाळासाहेब खवरे आदींनी भाग घेतला. यावेळी दुकानदारांना ग्रामपंचायतीमार्फत सुचना पत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment