तेऊरवाडी गाव तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन, सर्व दुकाने बंद - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2020

तेऊरवाडी गाव तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन, सर्व दुकाने बंद

तेऊरवाडी गावच्या प्रवेशद्वाराजळ लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना सरपंच सुगंधा कुंभार, उपसरपंच सौ. शालन पाटील, पो. पाटील प्रकाश पाटील, प्रकाश दळवी.
तेऊरवाडी (प्रतिनिधी) 
देशात चालू असलेल्या कोरोना विषाणू साथिचा प्रादुर्भाव आपल्या गावातील कोणालाही व्यक्तिला होऊ नये म्हणून संपूर्ण तेऊरवाडी गावानेच स्वतःला होम कॉरंटाईन करुन घेतले आहे.
तेऊरवाडी  गावाने लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन चालू केले आहे. यासाठी सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार, उपसरपंच सौ. शालन पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे, बजरंग पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दळवी, रवीद्र पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशिल आहेत. गावात लॉकडाऊन  झाल्यानंतर मुंबई, पुणे व बाहेरगावाहून जवळपास ७० जण दाखल झाले आहेत. या सर्वांची वैद्यकिय तपासणी करून होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. गावातील सर्व रस्त्याच्या दुतर्फा दोन वेळा औषध फवारणी करण्यात आली. १ ते ३ एप्रिल 2020 दरम्यान संपूर्ण गाव शंभर टक्के बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये दूध संकलनही बंद ठेवण्यात आले असून शेताकडे जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. गावातील सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तेऊरवाडी बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. पण पोलिस पाटील प्रकाश पाटील यांनी कडक भूमिका घेतल्याने बसस्थानकावर शुकशुकाट आहे. या तीन दिवसात बाहेरील कोणाला गावात प्रवेश नाही तर गावातील कोणालाही बाहेर जाता येणार नाही . त्यामूळे तेऊरवाडी गाव सध्या तरी  होम कॉरटाईन झाले आहे.

No comments:

Post a Comment