शिरगाव येथील वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने? लोकांत उलटसुलट चर्चा, खबरदारी म्हणून संपर्कातील अठरा जणांची गडहिंग्लज येथे रवानगी - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2020

शिरगाव येथील वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने? लोकांत उलटसुलट चर्चा, खबरदारी म्हणून संपर्कातील अठरा जणांची गडहिंग्लज येथे रवानगी


चंदगड / प्रतिनिधी
मजरे शिरगांव (ता. चंदगड) येथील एक 65 वर्षे वृध्दाचा काल रात्री अचानक हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. मयत झालेला हा वृध्द होम कॉरंटाईन होता. त्यामुळे त्याचा मृत्यू कोरोना व्हायरसमूळे झाला की कोणत्या अन्य कारणामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलत त्याच्या संपर्कातील 18 जणांची रवानगी गडहिंग्लज येथे करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालानंतरच सर्व काही स्पष्ट होणार आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी – शिरगाव येथील हा वृध्द व्यक्ती मूंबई येथे हॉटेलमध्ये कामाला होते. कोरोना व्हायरसच्या भीतीने तो 27 मार्च रोजी आपल्या मूळ गावी शिरगावला परतली. त्यानी 28 रोजी चंदगड ग्रामीण रूग्णांलयात तपासणी करून घेतली होती. 31 मार्च 2020 रोजी त्यांना तब्बेतीचा त्रास जाणवल्याने चंदगड ग्रामीण रुग्णांलयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री साडेदहा वाजता त्याचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू झाला. 
हि वृध्द व्यक्ती ज्या ठिकाणी मुंबई येथे काम करत होता. त्या ठिकाणचा एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह  असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपणाला ही लागण झाली की काय याचा मोठा धसका त्याने घेतला व  यावेळी त्याच धसक्याने  काल रात्री साडे दहा वाजता उपचार घेत असतानाच अचानक त्याचा मृत्यू झाला अशी चर्चा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कातील 18 लोकांना तातडीने चंदगड आरोग्य पथकाने गडहिंग्लज  येथे तपासणीसाठी रवाना केले असून  त्यांच्यावर करडी नजर ठेवली आहे. 

              वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजेल - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खोत
शिरगाव येथील मयत वृध्द व्यक्ती ही मुंबई येथे ज्या ठिकाणी कामाला होती, त्या ठिकाणी त्याच्या संपर्कातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह होता. शिरगाव येथील व्यक्तीने चार दिवसापूर्वी तपासणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. मात्र मुंबईचा त्याचा सहकारी पॉझिटीव्ह असल्याच्या धसक्याने त्याचा मृत्यू झाला असला तरी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घरातील व्यक्तींसह 18 जणांना गडहिंग्लज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment