माणगाव कोरोनामुळे शंभर टक्के लॉकडाऊन, ग्रामस्थांकडूनही प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2020

माणगाव कोरोनामुळे शंभर टक्के लॉकडाऊन, ग्रामस्थांकडूनही प्रतिसाद

माणगांव येथे लॉकडाउन काळात दक्षता समितीचे सदस्य लोकाना घराबाहेर पडू नका असे आवाहन करताना .
कोवाड / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्था शंभर टक्के लॉकडाऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गावामध्ये जनता कर्फ्यू असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.
देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने माणगाव ग्रामस्थानी खबरदारी घेतली आहे. गावातून बाहेर जाणाऱ्याची अडवणूक केली जात आहे. नवीन येणाऱ्यांचे विलगीकरण केले जात आहे. ग्रामपंचायतीकडून  स्वच्छतेसह वारंवार जंतूनाशक औषध फवारणी सरू केली आहे . खबरदारीचा उपाय म्हणून गावातीला प्रमख रस्ते सीलबंद केले आहेत. बाजारपेठेतील सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद केले आहेत. बँका आणि दुध संस्थाही बंद ठेवल्या आहेत. तसेच होम कारटाईनवर ग्रामपंचायतीच्या दक्षता समितीने नजर ठेवली आहे. आरोग्य केंद्राकडून कारंटाईन लोकांची चौकशी केली जात आहे. नागरिकाना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे. अत्यावश्यक सेवेत फक्त दवाखाने व औषध दुकाने सुरु ठेवली आहेत. विनाकारण घराबाहेर पडणान्यांच्यावर सरपंच अश्विनी कांबळे व ग्रामविकास अधिकारी ए. बी. दोरुगडे यांनी कारवाईच्या सुचना केल्याने गावात शुकशुकाट निर्माण झाला आहे. 

No comments:

Post a Comment