आम्ही कोरोना विरोधात ताकतीने लढू - सरपंच नम्रता पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2020

आम्ही कोरोना विरोधात ताकतीने लढू - सरपंच नम्रता पाटील

शिनोळी येथे कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेला कर्मचारी वर्ग.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
      संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात भीतीचे वातावरण तयार केलेल्या कोरोना या विषाणू विरोधात आम्ही ताकतीने लढू आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना या महामारी विरोधात लढण्यास बळ देऊ त्यासाठी आम्ही शिनोळी गावचे नागरीक सतर्क राहु असे आवाहण शिनोळी (ता. चंदगड) च्या सरपंच नम्रता पाटील यांनी केले.
       सरपंच सौ. पाटील ह्या  काही दिवसा पासून ग्रामपचांयतीचे सर्व सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते ,आरोग्य सेविका ,आशा ,अंगणवाडी सेविका  यांच्या मदतीने  नियोजन करून गावचे आरोग्य सांभाळत आहेत. गावात आतापर्यंत 2 वेळा औषध फवारणी  करून जनता कर्फ्यू दिवशी 100% बंद यशस्वी केल्याची माहीती त्यांनी दिली. तसेच जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या सहकार्याने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना मास्क व सॅनिटायजर  मोफत प्रधान केले. रेशन संदर्भात पुरवठा कर्मचारी इनामदार  व विठोबा राऊत यांच्या सहकार्याने सुरळीत रेशन वाटप सुरू आहे तसेच ग्रामपंचायत स्वनिधीतून  मागासवर्गीय कुटुंबांना  मोफत रेशन तेल डाळ आशा जीवनावश्यक वस्तू वाटप केले जात आहे.
       गाव पूर्ण बंद ठेवून सर्व गावातील पुजाऱ्यांच्या सहाय्याने कोरोनाचा लवकरात लवकर नायणाट होण्यासाठी देवांना साकडे घालण्यात आले. रोज कडडकडीत बंद असून दररोज किराणा मालाची दुकाने दोन सत्रात 6 तास व मेडिकल सतत उघडे ठेवली जात आहेत. प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्याची जपणूक करण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविका याना किट प्रधान केली आहे.
     आजपर्यंत आरोग्य सेविका स्मिता पाटील,अंगणवाडी सेविका वनिता सावी,सुधा पाटील,इंदिरा करटे आशा कार्यकर्त्यां सुनंदा खांडेकर, सुनीता पाटील ग्रामपंचायत कर्मचारी उमेश पाटील उमेश ओउळकर, परशराम नाईक यांनी 24 तास कष्ट घेऊन उत्कृष्ट सेवा बजावली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      या सर्व यंत्रणेचे नियोजन ग्रामसेवक विठठल नाईक, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, नागरीक व सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊण आहेत.

No comments:

Post a Comment