आमदार राजेश पाटील यांचेकडून कोविड-१९ साठी पन्नास लाखांचा स्थानिक विकास निधी, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2020

आमदार राजेश पाटील यांचेकडून कोविड-१९ साठी पन्नास लाखांचा स्थानिक विकास निधी, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

राजेश पाटील
तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानी कोरोनाच्या उच्चाटनासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून वैदयकिय सामुग्री व साहित्य खरेदीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी तातडीने खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. तसे पत्र आमदार पाटील यानीं जिल्हाधिकारी दौलत देसाई याना दिले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी चंदगड, गडहिंग्लज वआजरा या मतदारसंघात सर्व ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैदयकिय उपकरणांची तात्काळ गरज आहे. यामध्ये प्राधान्याने जे डॉक्टर कोविडसाठी लढत आहेत अशा सरकारी व इंडियन मेडिकल असोसिएशन मान्यताप्राप्त वैद्यकिय डॉक्टरना पीपई किट पुरवणे, इनफ्रारेड थर्मामिटर, आशा संयसेविका, अंगणवाडी सेविका यांना फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, गडहिंग्लज येथील १०० कॉट हॉस्पीटल करता दोन व्हॅटीलेटर पुरवणे, मतदार संघातील सर्व गावामध्ये औषध फवारणेकरिता सोडिअम  हायड्रोक्लोराईड सोल्यूशन कॅन पुरवणे. याकरीता हा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आमदार राजेश पाटील यानी सांगीतले. हा पन्नास लाखांचा निधी  कोविड-१९ साठी आमदार राजेश पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून तात्काळ खर्च करण्यासाठी  उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment