![]() |
देवरवाडी गावात जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामस्थांनी नाकाबंदी केली आहे. |
शिनोळी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील आग्नेय सीमेस कर्नाटक हद्दीलगतच्या महिपाळगड, देवरवाडी, शिनोळी खुर्द व बुद्रुक या चार गावच्या वेस व सीमा करोना प्रसार रोखण्यासाठी सील करण्यात आल्या आहेत. ३ मे 2020 पर्यत वाढवलेल्या लाँकडाऊन मुदतीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसह अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यक्तीना गावात प्रतिबंध करण्यात येत आहे.
महिपाळगड येथे आजपासून रोजच घरासमोरील प्रवेशदार व गटारांच्यामध्ये सँनिटायजर फवारणी करण्याचे नियोजित केले आहे. सरपंच रमेश भोसले, पोलिस पाटील कोमल सावंत, ग्रामसेवक एस. टी. वारे, वैजनाथ कदम, तुकाराम तुपारे यासह दक्षता समितीचे सदस्य कार्यरत झाले आहेत. देवरवाडी येथे सरपंच दशरथ भोगण, पो. पा. जयवंत कांबळे, ग्रामसेवक विठ्ठल नाईक, विजय भांदूर्गे, अजित कांबळे व दक्षता समितीचे कार्यकर्ते सीमा रोखून आहेत. शिनोळी खुर्दला सरपंच नम्रता पाटील यांच्या नियोजनाखाली लाँकडाऊन पालन व लोकजागृती उपक्रम राबवित आहेत. शिनोळी बुद्रुकला सरपंच नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी देवस्की पाळक पाळून उंबराबंदी करण्यात आली आहे. दरम्यान जि. प. सदस्य अरूण सुतार यांचा चारही गावी संपर्क ठेवून प्रशासनामधील दुवा साधून आहेत. तलाठी चंद्रकांत पाटील हे शिनोळी तसेच तुडिये परीसरातील सर्व गावात नियमित भेटी देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गत होणारे आदेश तसेच मार्गदर्शक सुचना स्थानिक पातळीवर प्रसारीत करीत आहेत.
No comments:
Post a Comment