महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बाची (जि. बेळगाव) येेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. |
चंदगड तालूक्याच्या राज्य हद्दीजवळील कर्नाटकातील बाची (ता.जि.बेळगाव) येथे कोरोना प्रतिबंधक महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यातून ये-जा करणार्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. बेळगावहून चंदगड कोकणात जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना प्रतिबंध केला जात आहे. वडगाव ग्रामीण पोलिसठाण्याचे निरीक्षक सुनिलकुमार नंदीश्वर यांच्या निर्देशाखाली पाळीनुसार चार पोलिस कर्मचारी चोविस तास खडा पहारा देत आहेत. तपासणी नाक्यावर पोलिस कर्मचारी महेश नाईक व प्रसाद मोरेसह कनिष्ठ आरोग्य तपासणीस संगमेश गोगी व नाक्याशेजारील सेवाभावी तरूणी नीता हुंद्रे पहारा देत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या मार्गदर्शनाने दोन कनिष्ठ आरोग्य तपासणीस नियुक्त केलेले आहेत.
No comments:
Post a Comment