घरी बोलावून केस कापून घेणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार - पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

घरी बोलावून केस कापून घेणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार - पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

चंदगड / प्रतिनिधी 
कोरोना विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्व स्तरावर  मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने शासनाने जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या आदेशाने दिनांक 25 /3 /2020  रोजी  पासून संपूर्ण देशात संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केले आहे.  अध्यक्ष जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण  तथा जिल्हादंडाधिकारी व  जिल्हाधिकारी यांचे आदेशाने लॉकडाऊन कालावधीत अत्यावशक सेवा व जीवनावश्यक वस्तू  वितरण वगळता  सर्व आस्थापनावर  बंदी घालणेत आलेली आहे.  त्यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून  त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केलेस संबंधितावर भारतीय दंडसहिता  चे कलम  188, 269 व 270 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच  संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत  शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्याच्या घरी जाऊन केसकर्तनालयचा व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांच्या वर व्यक्तीस तसेच केसकर्तनालास घरी बोलणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पारित केला आहे. 


No comments:

Post a Comment