अडकूर येथील रामचंद्र देसाई यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोळा हजारांचा धनादेश - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2020

अडकूर येथील रामचंद्र देसाई यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोळा हजारांचा धनादेश

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांच्याकडे सुपुर्द करताना रामचंद्र देसाई. 
चंदगड / प्रतिनिधी
देशात कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे. त्यामुळे अनेक हातावरचे पोट असणारे लोक अडकून पडल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रोगाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेडिकल साहित्याची गरज आहे. पैशाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. या संकटाच्या वेळी धावून जाणे हे मानवतेचे लक्षण आहे. त्यामुळे अडकूर (ता. चंदगड) येथील दानशूर निवृत्त पोलीस हवालदार रामचंद्र कृष्णाजी देसाई यांनी मुखमंत्री सहाय्यता निधीसाठी  16000 हजार रुपयांचा चेक नायब तहसीलदार डी. एम. नांगरे  याचेकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दानशूर व्यक्तीचे मोलाची मदत व देश सेवेचे व्रत घेण्याऱ्याची संख्या नगण्य आहे. त्या पैकी एक अडकुरचे दानशूर निवृत्त पोलीस हवालदार रामचंद्र कृष्णाजी देसाई (वय-75) हे आहेत. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 


No comments:

Post a Comment